(१) राष्ट्राराष्ट्रांमध्ये तणावाचे, हिंसक असे वातावरण न राहता मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होणे, म्हणजेच 'जागतिक शांतता' होय.
(२) केवळ आपल्या देशात शांतता निर्माण होऊन नव्हे; तर शेजारील देशांतही शांतता असेल, तरच जागतिक शांतता निर्माण होईल.
(३) जागतिक शांतता राष्ट्राराष्ट्रांतील मैत्रीपूर्ण संबंधांवर व सहकार्यावर अवलंबून असते.
(४) अण्वस्त्रे आणि शस्त्रास्त्रवाढ जागतिक शांततेला धोका निर्माण करतात.
(५) दारिद्रय, आक्रमकता, धर्मांधता, वाढता वंशवाद आणि अतिरेकी राष्ट्रवाद यांमुळे जागतिक शांततेला तडे जातात.
(६) आर्थिक विकास, सामंजस्याचे धोरण, सहकार्याची वृत्ती, लोकशाही समाज आणि अन्य राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाविषयीचा आदर या गोष्टी जागतिक शांततेला पूरक ठरतात.