इतिहास - शैक्षणिक वाटचाल — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - शैक्षणिक वाटचाल3 Marks
Question
विद्यापीठ शिक्षण आयोग कोणती कामे करतो ?
✓
Answer
१९४८ साली स्थापन झालेला विदयापीठ शिक्षण आयोग पुढील कामे करतो : (१) विद्यापीठांना आर्थिक अनुदान मंजूर करून त्याचे वाटप करणे. (२) विद्यापीठांचा दर्जा व समन्वय राखणे आणि नवी विद्यापीठे स्थापन करणे. (३) विद्यापीठीय शिक्षणाचे नियोजन करणे व अभ्यासक्रमात सुसूत्रता आणणे. (४) शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य देणे. (५) उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी करणे. (६) विद्यापीठ विकास परिषदा स्थापन करणे. (७) पदव्युत्तर अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्रे स्थापन करण्यास मदत करणे. (८) 'कंट्रिवाइड क्लासरूम' या कार्यक्रमाचे आयोगाच्या वतीने दूरदर्शनवरून प्रसारण करण्यात आले.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.