इतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान3 Marks
Question
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना 'मिसाईल मॅन' असे का संबोधले जाते ?
✓
Answer
१९८३ नंतर संरक्षण संशोधन आणि विकास (DRDO) या संस्थेचे अध्यक्ष म्हणून डॉ. कलाम यांची निवड झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली - (१) 'पृथ्वी' आणि 'अग्नी' या क्षेपणास्त्रांच्या (मिसाईल्सच्या) यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या. (२) इंटिग्रेटेड गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. (३) जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे बनवण्यात आली. असे बहुमोल योगदान देणाऱ्या व क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक असणाऱ्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना 'मिसाईल मॅन' असे संबोधले जाते.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.