Question types

दोन चलांतील रेषीय समीकरणे question types

53 questions across 6 question groups — pick any mix to generate a Maths - मराठी paper with step-by-step answer keys.

53
Questions
6
Question groups
5
Question types
Sample Questions

दोन चलांतील रेषीय समीकरणे questions

One sample from each question group in this chapter. Select any group above to see the full set with answer keys.

ax + by = c व mx + ny = d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर an ≠ bm तर दिलेल्या समीकरणांना-
  • A
    एकाच उकल असेल.
  • B
    उकल नसेल.
  • C
    असंख्य उकली असतील.
  • D
    फक्त दोन उकली असतील.
View full solution
x + y = 3; 3x - 2y - 4 = 0 ही एकसामयिक समीकरणे सोडवण्यासाठी D ची किंमत किती?
  • A
    5
  • B
    1
  • C
    -5
  • D
    -1
View full solution
$x$ व $y$ ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर $D_x=49, D_y=-63$ व $D=7$ असेल तर $x =$ किती?
  • A
    7
  • B
    -7
  • C
    $\frac{1}{7}$
  • D
    $\frac{-1}{7}$
View full solution
खालील कृती पूर्ण करून एकसामयिक समीकरणे सोडवा.
5x + 3y = 9 ......(I)
2x - 3y = 12 ......(II)
समी. (I) व समी. (II) यांची बेरीज करू.
5x + 3y = 9
+ 2x - 3y = 12
${\square}$x =${\square}$
x = $\frac{\square}{\square}$ x = ${\square}$
x = 3 समी. (I) मध्ये ठेवू.
5 ×${\square}$+ 3y = 9
3y = 9-${\square}$
3y =${\square}$
$y=\frac{\square}{3}$
y =${\square}$
(x, y) =(${\square}$,${\square}$)ही समीकरणाची उकल आहे.
View full solution
एक दोन अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 143 आहे, जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा 3 ने मोठा असेल, तर दिलेली मूळची संख्या कोणती? उत्तर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
समजा, एकक स्थानचा अंक = x
दशक स्थानचा अंक = y
∴ मूळ संख्या =${\square}$y + x
अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या = ${\square}$x + y
पहिल्या अटीवरून,
दोन अंकी संख्या + अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या = 143
10y + x + ${\square}$= 143
${\square}$x +${\square}$= 143
x + y =${\square}$.......(I)
दुसऱ्या अटीवरून,
एकक स्थानचा अंक = दशक स्थानचा अंक + 3
x =${\square}$ + 3
x - y = 3 .....(II)
(I) व (II) यांची बेरीज करून,
2x =${\square}$∴ x = 8
x = 8 समीकरण (I) मध्ये ठेवून,
x + y = 13
8 +${\square}$ = 13
∴ y = ${\square}$
मूळ संख्या = 10y + x
= ${\square}$+ 8 = 58
View full solution
वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची वये काढा.
View full solution
दोन संख्यांमधील फरक ३ असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज १९ आहे, तर त्या संख्या शोधा.
View full solution
विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने, तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. बसचा सरासरी वेग 60 किमी दर तास आहे, तर विमानाचा सरासरी वेग 700 किमी/तास आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासांत पूर्ण केला असेल, तर विशालने बसने किती किमी प्रवास केला?
View full solution
10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये A आणि B अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर A प्रकारच्या 150 पेट्या व B प्रकारच्या 100 पेट्या भरल्या, तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. जर A प्रकारच्या 260 पेट्या भरल्या, तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास B प्रकारच्या 40 पेट्या लागतात, तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती?
View full solution
एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक काढा.
View full solution

Generate a दोन चलांतील रेषीय समीकरणे paper free

Pick question groups from the list above, set marks and difficulty, and export a branded PDF with step-by-step answer keys. First 3 chapters free — no signup.

Download App