Questions

भूगोल - स्पष्ट करा : [4M]

Take a timed test

7 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 14 Marks
भौगोलिक क्षेत्रभेटीचे महत्त्व स्पष्ट करा.
Answer
(१) क्षेत्रभेट ही भूगोलातील एक महत्त्वाची अभ्यासपद्धती आहे. भौगोलिक क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो.
(२) मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेण्यासाठी भौगोलिक क्षेत्रभेटी अत्यंत उपयुक्त ठरतात.
View full question & answer
Question 24 Marks
क्षेत्रभेटीच्या वेळी कोणती काळजी घ्यावी ?
Answer
क्षेत्रभेटीच्या वेळी पुढील काळजी घ्यावी: (१) क्षेत्रभेटीसाठी जाताना स्वतःची व इतरांची सुरक्षितता पाहावी.
(२) क्षेत्रभेटीदरम्यान शिक्षकांच्या सूचनांचे योग्य पालन करावे.
(३) दुर्गम, अनोळखी ठिकाणी एकटे जाऊ नये.
(४) क्षेत्रभेटीच्या परिसरात वावरताना स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा.
(५) क्षेत्रभेटीदरम्यान आपल्याकडून तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
(६) क्षेत्रभेटीच्या वेळी आपत्कालीन स्थितीसाठी प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवावी.
View full question & answer
Question 34 Marks
क्षेत्रभेटीच्या ठिकाणाची निवड करताना कोणती खबरदारी घ्यावी ?
Answer
क्षेत्रभेटीच्या ठिकाणाची निवड करताना पुढील खबरदारी घ्यावी : (१) क्षेत्रभेटीच्या ठिकाणाची निवड करताना प्राकृतिक भूरूपे, नदीकिनारा, धरण, सागरकिनारा, पर्यटनस्थळ, भौगोलिक घटकांशी संबंधित संग्रहालय किंवा कार्यालय, खेडेगाव, वनक्षेत्र इत्यादी स्थानिक परिस्थितीची माहिती घेणे आवश्यक ठरते.
(२) क्षेत्रभेटीच्या ठिकाणाची निवड करताना आवश्यक ती परवानगीपत्रे घेणे गरजेचे असते.
View full question & answer
Question 44 Marks
क्षेत्रभेटीच्या पूर्वतयारीत कोणत्या बाबींचा समावेश होतो ?
Answer
क्षेत्रभेटीच्या पूर्वतयारीत पुढील बाबींचा समावेश होतो :
(१) क्षेत्रभेटीचे ठिकाण व त्या ठिकाणाला भेट देण्याचा हेतू निश्चित करणे.
(२) क्षेत्रभेटीत आपण कोणत्या घटकांचे निरीक्षण करणार आहोत ते ठरवणे.
(३) ज्या ठिकाणी भेट देणार आहोत त्या ठिकाणचा नकाशा, तेथे जाण्याचा मार्ग - नकाशा यांचा अभ्यास करणे.
(४) क्षेत्रभेटीच्या ठिकाणाचे अंतर, तेथे जाण्याचे वाहतूक मार्ग, वाहतूक साधने, क्षेत्रभेटीसाठी लागणारा वेळ इत्यादी बाबींचे नियोजन करणे. क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार प्रश्नावली तयार करणे.
(५) आवश्यकतेनुसार पूर्वपरवानगी मिळवणे.
View full question & answer
Question 54 Marks
प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दाखवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त असते, ते सकारण स्पष्ट करा.
Answer
(१) प्रदेशातील लोकसंख्या या घटकाचे प्रत्यक्ष वितरण दाखवण्यासाठी टिंब पद्धत किंवा क्षेत्रघनी पद्धत उपयुक्त असते.
(२) लोकसंख्या या घटकाचे वितरण उपविभागांनुसार विलग असते व हा घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो.
(३) टिंब पद्धत : टिंब पद्धतीच्या नकाशात एखादया प्रदेशामध्ये लोकसंख्या हा घटक ज्या तऱ्हेने वितरित झाला आहे, तशाच त-हेने नकाशात टिंबे देऊन त्याचे वितरण दाखवले जाते. लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे, तर नागरी लोकसंख्या प्रमाणबद्ध गोलाद्वारे दाखवली जाते.
(४) क्षेत्रघनी पद्धत : क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात लोकसंख्येचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जातो. लोकसंख्या वितरणाचे जास्तीत जास्त मूल्य व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन ५ ते ७ गट (मूल्यवर्ग) ठरवले जातात. प्रत्येक गटाचे (मूल्यवर्गाचे) मूल्य वेगळे असल्यामुळे प्रत्येक गटाच्या (मूल्यवर्गाच्या) मूल्याप्रमाणे वेगवेगळ्या रंगछटांच्या किंवा कृष्णधवल आकृतिबंधाच्या आधारे लोकसंख्येचे उपविभागनिहाय वितरण दाखवले जाते.
View full question & answer
Question 64 Marks
समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक स्पष्ट करा.
Answer
समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक पुढीलप्रमाणे आहे : (१) जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो. याउलट जेव्हा एखादया चलाचे वितरण उपविभागानुसार विलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी क्षेत्रघनी पद्धतीचा वापर केला जातो.
(२) समघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर केला जातो. याउलट, क्षेत्रघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवण्यासाठी उपविभागांच्या सीमारेषांचा वापर केला जातो.
(३) समघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जात नाही. याउलट, क्षेत्रघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जातो.
View full question & answer
Question 74 Marks
वितरणाच्या नकाशांचे उपयोग व प्रकार स्पष्ट करा.
Answer
(अ) वितरणाच्या नकाशांचे उपयोग: वितरणाच्या नकाशांद्वारे एखाद्या प्रदेशातील विशिष्ट घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध स्पष्ट होतो.
(ब) वितरणाच्या नकाशांचे प्रकार : वितरणाच्या नकाशांचे पुढील तीन प्रकार पडतात :
(१) टिंब पद्धत : मुक्तपणे विखुरलेल्या घटकाचे वितरण
दाखवण्यासाठी टिंब पद्धतीचा वापर केला जातो. टिंब पद्धतीच्या नकाशात एखाद्या प्रदेशामध्ये एखादा घटक ज्या त-हेने वितरित झाला आहे, तशाच तन्हेने नकाशात टिंबे देऊन त्या घटकाचे वितरण दाखवले जाते.
(२) क्षेत्रघनी पद्धत : क्षेत्रघनी पद्धतीचे नकाशे तयार करताना एखादया भौगोलिक घटकाविषयीची आकडेवारी ५ ते ७ गटांत वेगवेगळ्या छायांनी किंवा छटांनी दाखवली जाते.
(३) समघनी पद्धत : जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो. उदा., उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी. समघनी पद्धतीच्या नकाशात संबंधित चलाचे वितरण सममूल्य रेषांच्या आधारे दाखवले जाते.
View full question & answer