समघनी व क्षेत्रघनी पद्धतींतील फरक पुढीलप्रमाणे आहे : (१) जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी समघनी पद्धतीचा वापर केला जातो. याउलट जेव्हा एखादया चलाचे वितरण उपविभागानुसार विलग असते, तेव्हा ते दाखवण्यासाठी क्षेत्रघनी पद्धतीचा वापर केला जातो.
(२) समघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवण्यासाठी सममूल्य रेषांचा वापर केला जातो. याउलट, क्षेत्रघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवण्यासाठी उपविभागांच्या सीमारेषांचा वापर केला जातो.
(३) समघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जात नाही. याउलट, क्षेत्रघनी पद्धतीत चलाचे वितरण दाखवताना प्रदेशातील उपविभागांचा विचार केला जातो.