Questions

राज्यशास्त्र - पुढील संकल्पना स्पष्ट करा [SHORT NOT - 2]

Take a timed test

5 questions · self-marked practice — reveal the answer and mark yourself.

Question 12 Marks
राष्ट्रीय सुरक्षा.
Answer
(१) प्रत्येक राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण होण्यासाठी प्रत्येक राष्ट्र जी सुरक्षा व्यवस्था अमलात आणते, करते, त्या व्यवस्थेला 'राष्ट्रीय सुरक्षा' असे म्हणतात.
(२) राष्ट्राराष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी, नदी पाणीवाटपासंबंधी वाद निर्माण होतात.
(३) निर्वासितांचे लोंढे येऊन संघर्ष उद्भवू शकतात.
(४) शेजारील राष्ट्र देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ शकते. अशा वेळी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते. म्हणून प्रत्येक राष्ट्राला आपली सैन्यदले अद्ययावत ठेवावी लागतात. राष्ट्रीय सुरक्षा चोख असणाऱ्या राष्ट्राचे अस्तित्व आणि सार्वभौमत्व अखंड टिकून राहते.
View full question & answer
Question 22 Marks
निमलष्करी दले.
Answer
(१) निमलष्करी दले ही पूर्णतः लष्करी नसतात आणि पूर्णतः नागरीही नसतात.
(२) देशाच्या संरक्षण दलांना साहाय्य करण्यासाठी निमलष्करी दले निर्माण केलेली असतात.
(३) मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी ही दले नागरिकांना मदत करतात. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात.
(४) निमलष्करी दलात सीमा सुरक्षा दल, तटरक्षक दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद कृतिदल यांचा समावेश होतो.
(५) ही दले देशाच्या सीमांचे रक्षण करण्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यात प्रशासनाला मदत करण्यापर्यंत सर्व प्रकारची कामे करतात.
View full question & answer
Question 32 Marks
गृहरक्षक दल.
Answer
(१) गृहरक्षक दल ही सैनिकी जीवनाचा अनुभव देणारी संघटना स्वातंत्र्यपूर्व काळातच स्थापन झाली.
(२) वीस ते पस्तीस वयोगटातील कोणत्याही स्त्री-पुरुष नागरिकास स्वेच्छेने या दलात सहभागी होता येते.
(३) गृहरक्षक दल पोलिसांच्या बरोबरीने अनेक मानवी व नैसर्गिक आपत्तींच्या वेळी नागरिकांना उपयोगी पडते.
View full question & answer
Question 42 Marks
मानवी सुरक्षा.
Answer
(१) राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नव्हे; तर देशात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा, हा नवा विचार शीतयुद्धानंतर पुढे आला.
(२) मानवी सुरक्षेत निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपण दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यास योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे, याचाही समावेश होतो.
(३) अल्पसंख्य व दुर्बलांचे रक्षण ही बाबही मानवी सुरक्षेत समाविष्ट असते.
(४) मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करणे, ही बाबही विचारात घेतली जाते.
View full question & answer
Question 52 Marks
जलद कृतिदलाचे कार्य.
Answer
संरक्षण दलांना साहाय्य करण्यासाठी जी निमलष्करी दले स्थापन करण्यात आली आहेत, त्यांत जलद कृतिदलाचा समावेश होतो. जलद कृतिदल पुढील कार्य करते :
(१) बॉम्बस्फोट, दंगे अशा स्फोटक परिस्थितीत सापडलेल्या निरपराध जनतेला मदत करते.
(२) देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास, अशा परिस्थितीत वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम करते.
View full question & answer