(१) उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कुटुंबप्रमुखाला गरजांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा लागतो, कारण कुटुंबाच्या गरजा अमर्यादित असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात.
(२) उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात.
(३) कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य असते.
(४) याची प्रचिती गाव किंवा शहराचे व्यवस्थापन, राज्याचे व्यवस्थापन, देशाचे व्यवस्थापन व जगाचे व्यवस्थापन यांतून येते. त्यास 'आर्थिक व्यवस्थापन' असे म्हणतात.