भूकंप होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत :
(१) भूपृष्ठाखालील भागात होणाऱ्या हालचार्लीमुळे भूकंप होतात.
(२) भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे, भूपट्ट सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात.
(३) ज्वालामुखींचा उद्रेक झाल्यामुळेही भूकंप होतात.
(४) याशिवाय, भूपृष्ठाखालील खडकांत विभंग निर्माण झाल्यास भूकंप घडून येतात.