(१) भूप्रदेशातील उत्पादन, वितरण, तसेच वस्तू व सेवांचा उपभोग यांच्याशी संबंधित असलेले उपक्रम म्हणजे अर्थव्यवस्था होय.
(२) अर्थव्यवस्थेतील उत्पादन साधनांची मालकी काही देशात खासगी व्यक्तींकडे, तर काही देशात सरकारकडे असते. तसेच काही देशांत खासगी व सरकारी मालकी एकत्रपणे आढळून येतात.
(३) काही अर्थव्यवस्थांचा मुख्य हेतू नफा मिळवणे हा असतो, तर सामाजिक कल्याण साधणे हा काही अर्थव्यवस्थांचा मुख्य हेतू असतो. तसेच काही अर्थव्यवस्थांमध्ये नफाप्राप्ती व सामाजिक कल्याण यांचे सहअस्तित्व असते.
(४) अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार त्यांची भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था असे वर्गीकरण करण्यात येते.
या अर्थाने जगातील देशांचे, अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार, तीन प्रकार पडतात.