Question
पर्यटन व आरोग्य यांमधील संबंध स्पष्ट करा.

Answer

(१) भारतामध्ये काही पर्यटक हे आरोग्य सुविधा घेण्यासाठी येतात.
(२) भारतातील पर्यटन स्थळांना भेटी देण्याबरोबरच भारतीय आयुर्वेद, योगशास्त्र, प्राणायाम यांतून शारीरिक सुदृढता व मनःशांती मिळावी हा आरोग्यविषयक पर्यटनामागील हेतू असतो.
(३) भारतातील रुग्णालयांत मिळणारे उपचार, केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया या तुलनेने कमी खर्चात होतात. त्यामुळे जगातील अनेक देशांतून रुग्ण भारतात येतात.
(४) अशा व्यक्तींना लागणाऱ्या सेवासुविधांपासून वैद्यकीय पर्यटन विकसित होते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free