(१) तापमान-क्षारता घनता यांतील भिन्नतेमुळे सागरी प्रवाहांची निर्मिती होते.
(२) या सागरी प्रवाहांमुळे सागरांतील पाण्याचे पृष्ठीय अभिसरण होते. त्यामुळे सागरजलाच्या तापमानावर नियंत्रण होते.
(३) इतकेच नव्हे, तर ज्या भूप्रदेशाजवळून हे सागरी प्रवाह जातात तेथील प्रादेशिक हवामानावरही या सागरी प्रवाहांचा प्रभाव पडतो.
(४) थोडक्यात, सागरी प्रवाहांमुळे तापमान संतुलनास, क्षारतेच्या संतुलनास मदत होते व हवामानावर परिणाम होतो.