Question
भारत सरकारने समाजकल्याण खाते स्थापन केले.

Answer

(१) भारतीय समाजात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे. स्वातंत्र्योत्तर काळात ही परिस्थिती बदलणे आवश्यक होते.
(२) स्त्रिया, मुले, दिव्यांग, अनुसूचित जाती व जमाती, अल्पसंख्याक समाज यांच्यापर्यंत विकासाच्या संधी पोहोचणे आवश्यक होते.
(३) भारतीय संविधानाने समानतेचे तत्त्व आणि कल्याणकारी राज्य यांचा स्वीकार केलेला आहे.
(४) त्यामुळे या परिस्थितीत बदल करण्यासाठी व दुर्बल घटकांचा विकास करण्यासाठी भारत सरकारने १४ जून १९६४ रोजी 'समाजकल्याण' हे स्वतंत्र खाते स्थापन केले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free