(१) समाजातील काही लोक नेहमी आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा विचार धार्मिक दृष्टिकोनातूनच करतात.
(२) विशिष्ट धर्माचे असल्याने आपण राजकारणात प्रभावशून्य आहोत, आपल्याच धर्माच्या लोकांवर अन्याय होतो, असा विचार हे लोक करतात.
(३) सरकारही आपल्या धर्माबाबत पक्षपात करीत आहे, अशी त्यांची धारणा बनते.
(४) आपल्या धर्माबद्दल आणि लोकांबद्दल ते अतिसंवेदनशील बनतात.
अशा वेळी त्यांच्या धर्माबद्दल कोणी बोलले, त्यांच्या प्रतीकांचा अपमान केला की त्यातून अनेकदा दंगली उद्भवतात.