Question
'ऑपरेशन ब्लू स्टार' करावे लागले.

Answer

(१) १९८० च्या दरम्यान पंजाबमध्ये ' स्वतंत्र खलिस्तान ' चळवळीला सुरुवात झाली व पुढे ती तीव्र बनली.
(२) जर्नेलसिंग भिंद्रानवाले याने सशस्त्र अनुयायी गोळा करून दहशतवादी कारवायांना सुरुवात केली.
(३) त्याने 'अकाल तख्त' या धार्मिक स्थळाचा आश्रय घेतला. त्याच्या अनुयायांनी सुवर्णमंदिराचा परिसर ताब्यात घेऊन अतिरेकी कारवाया केल्या. सुवर्णमंदिराला किल्ल्याचे स्वरूप आले व शांतता धोक्यात आली.
(४) या दहशतवाद्यांना सुवर्णमंदिरातून बाहेर काढून पंजाबात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारला 'ऑपरेशन ब्लू स्टार' करावे लागले.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free