(१) समुद्रकिनाऱ्यावर जेथे खडकाळ भाग असतो, तेथे सागरी कड्यांच्या पायथ्याशी लाटांचे पाणी आदळते व सागरी जलाचे तुषार खडकांवर आपटतात.
(२) या क्षारयुक्त पाण्यात खडकांतील विद्राव्य घटक मिसळतात, त्यामुळे खडकांत लहान छिद्रे तयार होतात. हा द्रवीकरणाचा परिणाम होय.
(३) अशा छिद्रांतून क्षारयुक्त पाणी साचते. सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याची वाफ होऊन पाणी निघून जाते व पाण्यातील क्षाराचे स्फटिकीकरण घडून येते. स्फटिक जास्त जागा व्यापतात. त्यामुळे खडकांत ताण निर्माण होतो व खडकावर छिद्रे तयार होऊन खडकाचा पृष्ठभाग मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे दिसू लागतो. अशा प्रकारे, द्रवीकरण व स्फटिकीकरण या प्रक्रियांमुळे कायिक विदारण होते.