Question
तापमानातील बदलांमुळे कायिक विदारण घडून येते.

Answer

(१) वाढत्या तापमानामुळे खडकांतील खनिजे प्रसरण पावतात व तापमान कमी झाल्यावर ती आकुंचन पावतात. अशा सततच्या प्रसरण-आकुंचनामुळे खडकांतील कणांत ताण निर्माण होतो.
(२) याशिवाय खडकांतील काही खनिजे जास्त प्रमाणात प्रसरण पावतात, तर काही खनिजे कमी प्रमाणात प्रसरण पावतात. त्यामुळे खडकांतील कणांमुळे निर्माण होणारा ताणही कमी-जास्त होतो. परिणामी खडकांना तडे जातात व खडक फुटतात.
(३) उष्ण वाळवंटी प्रदेशासारख्या दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असणाऱ्या प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. अशा प्रकारे, तापमानातील बदलांमुळे कायिक विदारण घडून येते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

विषुववृत्तीय समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी पडत नाही.###किंवा विषुववृत्तीय भूभागात दुपारनंतर पाऊस पडतो.
रासायनिक विदारणात पाण्याची भूमिका महत्त्वाची ठरते.
हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे-पुढे हलत होत्या.
मृत समुद्राची क्षारता सर्वाधिक आहे.
तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.
द्रवीकरण व स्फटिकीकरण या प्रक्रियांमुळे कायिक विदारण होते.
समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखी आढळत नाही.
ऑस्ट्रेलियाच्या केवळ पूर्व किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण जास्त आहे.
गारा नेहमी पडत नाहीत.
वालुकाश्म, पिंडाश्म यांसारख्या दगडांचे पाण्यामुळे कायिक विदारण (कणात्मक विदारण) होते.