(१) जगातील संघर्षग्रस्त प्रदेशांत कायमस्वरूपी शांतता निर्माण करण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्याचे काम संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना करते. सुरक्षा परिषदेच्या नियंत्रणाखाली ही शांतिसेना कार्य करीत असते.
(२) संयुक्त राष्ट्रांकडे स्वतःचे सैन्य नसते. संयुक्त राष्ट्रे सभासद-राष्ट्रांचे सैन्य स्वतःच्या नियंत्रणाखाली अशांत प्रदेशात पाठवते.
(३) संयुक्त राष्ट्रांनी आतापर्यंत युगोस्लाव्हिया, नामिबिया, सोमालिया, हैती, थायलंड अशा अनेक देशांत शांतिसेना पाठवल्या. भारतही आपले सैन्य शांतिसेनेत पाठवतो.
(४) शांतिसेना संघर्षग्रस्त प्रदेशातील लोकांना जीवनोपयोगी वस्तू, औषधे यांचाही पुरवठा करते.