Question
पाचव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे कोणती होती?

Answer

पाचव्या पंचवार्षिक योजनेत पुढील उद्दिष्टे ठरवण्यात आली होती :
(१) कृषिविकास व मूलभूत उद्योगधंदे यांत वाढ करून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे व मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणे.
(२) शिक्षण, सकस आहार व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
(३) वैद्यकीय उपचाराच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे.
(४) ग्रामीण भागात वीजपुरवठा करणे व दळणवळणाच्या सोयी पुरवण्यासाठी रस्तेबांधणी करणे.
(५) समाजकल्याणाच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवणे.
(६) अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूंची एकाधिकार पद्धतीने खरेदी करणे.
(७) देशातील दारिद्र्य दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे.
(८) सार्वजनिक वितरण व्यवस्थांद्वारा गरिबांना रास्त किमतीत अन्नधान्य पुरवणे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free

Similar questions

प्रदेशवादाचे कोणते दुष्परिणाम होतात ?
प्रधानमंत्री पदाच्या काळात अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या कार्याची माहिती लिहा.
दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत ?
सहाव्या पंचवार्षिक योजनेची उ‌द्दिष्टे कोणती होती?
ईशान्येकडील प्रदेशांना भारताच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी स्वातंत्र्यापासून कोणकोणते प्रयत्न झाले ?
जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे ?
दूरसंचार विभागाची कशा रितीने पुनर्रचना करण्यात आली ?
पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे भारतीय शास्त्रज्ञांना कोणता आत्मविश्वास आला ?
७३व्या व ७४व्या संविधान दुरुस्तीने स्त्रियांना कोणते अधिकार मिळाले ?
मिझोरमला घटकराज्याचा दर्जा मिळेपर्यंतच्या वाटचालीतील महत्त्वाच्या घटना लिहा.