प्रदेशवाद पुढील कारणांमुळे बळावतो -
(१) आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगण्यातून.
(२) माझा प्रांतच श्रेष्ठ मानण्याच्या वृत्तीतून.
(३) आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त झाल्यावर.
(४) विकासातील असमतोलातून.
(५) प्रादेशिक अस्मिता, स्थानिक परंपरा, संस्कृती यांच्या अनाठायी गौरवातून.
(६) दारिद्रय, बेरोजगारी, मागासलेपण अशा समस्यांतून.