शीतयुद्धाच्या काळात सुरू झालेल्या अलिप्ततावादी चळवळीचे महत्त्व शीतयुद्ध संपल्यावरही कमी झालेले नाही, या कारण या चळवळीने स्वीकारलेली पुढील भूमिका होय :
(१) अलिप्ततावादी चळवळ मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यांवर आधारलेली आहे.
(२) या चळवळीने विकसनशील राष्ट्रांना एकत्र येण्याची प्रेरणा दिली.
(३) आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततेच्या मागनि सोडवण्यास प्रोत्साहन दिले.
(४) निःशस्त्रीकरण, मानवी हक्कांचे संवर्धन यांबाबत आग्रही भूमिका घेतली.
(५) गरीब व अविकसित राष्ट्रांच्या समस्या निग्रहाने मांडल्या.
(६) नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी करून आर्थिक व सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणात आणले.
(७) अविकसित राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानाने उभे राहण्याचा नवा विश्वास दिला.