Question
जगातील कोणत्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे ?

Answer

(१) उष्ण कटिबंधात पावसाचे प्रमाण जगात सर्वांत जास्त आहे. उष्ण कटिबंधीय प्रदेशात बहुतांशी दिवस सूर्यकिरणे लंबरूप असतात.
(२) त्यामुळे या कटिबंधात तापमान नेहमीच जास्त असते. जास्त तापमानामुळे बाष्पीभवनही जास्त होते.
(३) ही बाष्पयुक्त हवा हलकी असते. ही हवा वर जाते व हवेच्या वरच्या भागातील कमी तापमानामुळे सांद्रीभवन क्रिया घडून पाऊस पडतो.
(४) त्याशिवाय जास्त उष्णतेमुळे या प्रदेशात अनेक वेळा ऊर्ध्वगामी प्रवाहही जोरदार असतात. या सर्व कारणांमुळे जास्त पावसाचे प्रदेश प्रामुख्याने उष्ण कटिबंधातच आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free