(१) तापमान आणि बाष्पीभवनाचे वेग, सागराला मिळणाऱ्या नद्यांद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा आणि समुद्राचे खुले किंवा भूवेष्टित स्वरूप हे घटक सागरजलाच्या क्षारतेवर परिणाम करतात.
(२) तापमान जास्त असल्यास बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. त्यामुळे क्षारता वाढते. उदा., उष्ण कटिबंधीय सागरांची क्षारता. याउलट समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी पडतात, तापमान कमी असते, त्यामुळे बाष्पीभवनही कमी होते, म्हणून क्षारता कमी असते.
(३) सागराला मिळणाऱ्या नद्य. उदा., बंगालचा उपसागर आणि वितळणारे बर्फ. उदा., आर्क्टिक महासागर येथे गोड्या पाण्याचा पुरवठा झाल्याने क्षारता कमी असते.
(४) खुल्या समुद्रात सागरप्रवाहांमुळे क्षारतेचे नियंत्रण/संतुलन होते. याउलट भूवेष्टित सागरात सागरप्रवाहांत अडथळे आल्यामुळे क्षारता वाढते/जास्त राहते. उदा., भूमध्य समुद्र.