Question
खोलीनुसार सागरजलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा.

Answer

(१) सागरजलाच्या पृष्ठीय तापमानाच्या तुलनेत खोलीनुसार होणारा बदल वैशिष्ट्यपूर्ण आहे. समुद्रसपाटीपासून खोल जावे तसतसे तापमान कमी होते. मात्र, तापमान कमी होण्याचे प्रमाण सर्वत्र सारखे नसते.
(२) खोलीनुसार तापमानात पडणारा फरक हा विषुववृत्ताजवळ सर्वाधिक असतो. विषुववृत्ताजवळ सागरजलाचे पृष्ठीय तापमान $१८^{\circ}$ से असते, ५०० मीटर खोलीवर $१२^{\circ}$ से असते, १००० मीटर खोलीवर $८^{\circ}$ से, १५०० मीटर खोलीवर $५^{\circ}$ से, तर २००० मीटर खोलीवर $४^{\circ}$ से होते.
(३) थोडक्यात, पृष्ठीय भाग ते २००० मीटर खोलीवर विषुववृत्ताजवळ हा बदल १८° से ते ४° से इतका असतो. मध्य अक्षवृत्तावर मात्र हाच बदल १४° से ते ४° से इतका असतो. ध्रुवीय प्रदेशात मात्र पृष्ठीय आणि खोलवर तापमान सर्वत्र ४° से असते.
(४) सागरपृष्ठावरून सूर्यकिरणांचे परावर्तन होते, काही प्रमाणातच सूर्यकिरणे एका ठरावीक खोलीपर्यंत जातात आणि या सूर्यकिरणांची तीव्रताही कमी असते. त्यामुळे २००० मीटर खोलीनंतर पृथ्वीवर सर्वत्र सागरजलाचे तापमान स्थिर ४° से आढळते. 

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free