Question
झोपडपट्ट्यांची समस्या स्पष्ट करा.

Answer

(१) नागरीकरणामुळे शहरांमधील लोकसंख्या झपाट्याने वाढते. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात शहरामध्ये निवास व्यवस्था वाढत नाहीत. बहुतांशी स्थलांतरित हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यांना शहरातील निवासस्थाने परवडत नाहीत.
(२) स्थलांतरित होणारे बहुतेक लोक रोजगारानिमित्त शहरात येतात; परंतु सर्वांना योग्य रोजगार मिळतोच असे नाही.
(३) असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर तात्पुरती व कच्च्या स्वरूपाची घरे बांधतात. ही घरे बहुधा अनधिकृत असल्याने, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सोईसुविधा मिळत नाहीत.
(४) झोपडपट्टीतील घरांची घनता खूप जास्त असते. रस्ते अरुंद असतात. मूलभूत सुविधांचा अभाव असतो. अशा झोपडपट्ट्या अनिर्बंधपणे वाढत असतात. त्यामुळे सामाजिक, आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free