(१) पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी स्थानिक बाजारात शेतमाल व भाजीपाल्याची विक्री करीत असे. शेतमालाला योग्य ती किंमत मिळत नसे आणि शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत असे.
(२) विपणनाचे तंत्र आकलन करणारा शेतकरी शेतमाल स्वच्छ करतो. त्याची चांगल्या वेष्टनात बांधणी करतो. त्यानंतर शहरातील सुपर मार्केट/मॉलशी संपर्क साधतो. त्यांच्यासमोर आपल्या मालाची गुणवत्ता, प्रतवारी व दराची माहिती सादर करतो.
(३) सादरीकरणाने प्रभावित होऊन, सुपर मार्केट त्या मालाची जाहिरात करतात आणि तो माल विक्रीसाठी ठेवतात. अशा प्रकारे विपणनाचे तंत्र अवलंबणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. त्याच्या मालाला पूर्वर्वीपेक्षा अधिक किंमत मिळते.
(४) नियमित ग्राहकांच्या उपलब्धतेमुळे त्याच्या उत्पादनाला चालना मिळते.
म्हणजेच, शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणन तंत्र उपयुक्त, किफायतशीर आणि अधिक नफा मिळवून देणारे आहे.