Question
धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक सांगा.

Answer

धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनांतील फरक पुढीलप्रमाणे आहे: (१) देवदर्शन, यात्रा इत्यादी कारणांसाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे, 'धार्मिक पर्यटन' होय. याउलट संस्कृतींचा अभ्यास करण्यासाठी केले जाणारे पर्यटन म्हणजे, 'सांस्कृतिक पर्यटन' होय.
(२) धार्मिक पर्यटनात देवदेवतांच्या मंदिरांना, साधुसंतांच्या समाधीस्थानांना भेटी देणे, त्या स्थळी विविध धार्मिक विधी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. याउलट सांस्कृतिक पर्यटनात एखादया ठिकाणच्या चालीरीतींची, लोककलांची, रूढी-परंपरांची माहिती मिळवणे व तेथील लोकजीवन प्रत्यक्ष अनुभवणे इत्यादी बाबींचा समावेश होतो.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free