इतिहास - भारतापुढील अंतर्गत आव्हाने — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - भारतापुढील अंतर्गत आव्हाने2 Marks
Question
नक्षलवादी चळवळी.
✓
Answer
(१) पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलबारी येथे १९६७ साली एक घटना घडली. (२) नक्षलबारी भागातील अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर यांनी संघटित होऊन काही शेतजमिनींभोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेतला. (३) या प्रदेशाला त्यांनी मुक्त प्रदेश म्हणून घोषित केले. (४) या उठावापासून प्रेरणा घेऊन पुढे ज्या अनेक चळवळी झाल्या, त्यांना 'नक्षलवादी चळवळी' म्हणतात. या चळवळीने कालांतराने दहशतवादाचा आश्रय घेतल्याने नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हान ठरलेला आहे.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.