(१) ऐतिहासिक दस्तऐवज, कागदपत्रे, ग्रंथ, नकाशे, हस्तलिखिते, चित्रफिती अशी सर्व ऐतिहासिक माहिती ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेली असते, त्या ठिकाणाला 'अभिलेखागार' असे म्हणतात.
(२) शासनाला आणि जनतेला मागणीप्रमाणे संदर्भ पुरवणे हे अभिलेखागाराचे काम असते.
(३) इतिहासलेखनासाठी आवश्यक असणारी विश्वसनीय माहिती व संदर्भ अभिलेखागारातून मिळतात. म्हणून अभिलेखागारांचे महत्त्व अनन्यसाधारण असते.
(४) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे असून ते आशिया खंडातील सर्वांत मोठे अभिलेखागार आहे.