Question
पर्यटनाचे पर्यावरणात्मक परिणाम सांगा.

Answer

(१) पर्यटन करताना काही वेळा पर्यटकांकडून पर्यावरणास हानी पोहोचू शकते, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो.
(२) काही प्रसंगी पर्यटकांनी पर्यटनस्थळी कचरा फेकला असता तेथे प्रदूषण होऊ शकते.
(३) परंतु, पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अवलंब केला असता, पर्यटकांकडून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही व पर्यावरणाचा ज्हास होणार नाही याची काळजी घेतली जाते व त्यामुळे पर्यावरणाचा समतोल टिकून राहतो.
(४) पर्यटकांनी पर्यावरणस्नेही पर्यटन केले असता, ध्वनिप्रदूषण टाळले जाते, वृक्ष व वन्य पशुपक्षी यांची दक्षता घेतली जाते व पर्यटन स्थळे व तेथील पर्यावरण स्वच्छ व आल्हाददायी राहते.
(५) पर्यावरणपूरक पर्यटन या संकल्पनेमुळे पर्यावरणाची योग्य ती काळजी घेऊन पर्यटन स्थळांचा विकास केला जातो.
(६) निवासस्थाने, रिसॉर्टस, वाहतुकीचे मार्ग इत्यादी घटकांची रचनादेखील पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाते.
(७) या विकासात वीज, पाणी यांचा काळजीपूर्वक वापर केला जातो. पुनर्वापर संकल्पनाही वापरली जाते. 
(८) पर्यावरणाची नैसर्गिक स्थिती राखून पर्यटन विकसित केले जाते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free