Question
'स्मार्ट सिटी' ही संकल्पना स्पष्ट करा.

Answer

(१) नागरी विकासांतर्गत 'स्मार्ट सिटी' ही संकल्पना अलीकडच्या काळात पुढे आली आहे.
(२) विकसित नगरांना माहिती संप्रेषण तंत्र वापरून अद्ययावत करण्यासाठी आणि या शहरातील मालमत्तेचे व्यवस्थापन जास्तीत जास्त सुलभतेने हाताळण्यासाठी 'स्मार्ट सिटी' योजना आकाराला आली.
(३) या योजनेचा मुख्य उद्देश माहिती संप्रेषणाद्वारे शहरांतील विविध घटकांची माहिती गोळा करून त्याद्वारे शहरांचा नियोजनबद्ध विकास करणे असा आहे.
(४) या माहितीचा उपयोग शहरांतील वाहतूक व संपर्कयंत्रणा या जास्त सक्षम करण्यासाठी होईल. अत्यावश्यक वेळेस किंवा आपत्कालीन स्थितीत यंत्रणांना वेळेत प्रतिसाद देता येणे इत्यादी बाबींचा यात समावेश आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free