(१) दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत रशिया ही दोन राष्ट्र आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नांत एकमेकांची स्पर्धक बनली.
(२) या दोन राष्ट्रांत उघडपणे युद्ध झाले नाही; परंतु युद्धाचा भडका उडेल असे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
(३) दोन महासत्तांतील संघर्ष, सत्तास्पर्धा, शस्त्रस्पर्धा, शह-काटशह यांमुळे जगात युद्धाला पूरक वातावरण निर्माण झाले.
या युद्धसदृश परिस्थितीलाच 'शीतयुद्ध' असे म्हटले जाते.