इतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान3 Marks
Question
अणुऊर्जा निर्मितीसंबंधात कोणते प्रकल्प सुरू झाले ?
✓
Answer
(१) १९५६ मध्ये अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी 'अप्सरा' कार्यान्वित झाली. (२) १९६९ मध्ये मुंबईजवळ तारापूर येथे अणुशक्ती केंद्राची स्थापना झाली. (३) वीजनिर्मितीसाठी थोरिअमचा उपयोग साध्य करण्यासाठी कल्पकम येथे 'रिएक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले. (४) अणुशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या जड पाण्याचे कारखाने वडोदरा, तालचेर, तुतिकोरिन व कोटा या ठिकाणी उभारले गेले. (५) जड पाण्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्यासाठी 'हेवी वॉटर प्रोजेक्टस्' या संस्थेची उभारणी करण्यात आली; याच संस्थेला नंतर 'हेवी वॉटर बोर्ड' असे नाव दिले गेले. (६) १९८५ साली मुंबईजवळील तुर्भे येथे संपूर्ण भारतीय बनावटीची ध्रुव अणुभट्टी सुरू करण्यात आली. अशा रितीने अणुऊर्जा निर्मितीसंबंधात भारतभर अनेक प्रकल्प सुरू झाले.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.