Question
आंतरराष्ट्रीय वाररेषेचे महत्त्व व उपयोग स्पष्ट करा.

Answer

(१) आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे दळणवळण, हवाई वाहतूक, आंतरराष्ट्रीय प्रवास आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यांत उत्तम समन्वय, सुसूत्रता आणता येते.
(२) आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ, वार व तारखेचे गणित अचूक ठेवता येते. जागतिक वाहतुकीचे वेळापत्रक योग्य पद्धतीने हाताळण्यात आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्त्वाची आहे.
(३) आंतरराष्ट्रीय वाररेषा ही पूर्णतः समुद्रावरून जाते, मात्र तरीही ती जास्तीत जास्त १८० रेखावृत्ताला अनुसरून जाते.
(४) पृथ्वीवरील नवीन दिवसाची सुरुवात व आधीच्या वाराचा शेवट आंतरराष्ट्रीय वाररेषेवर होत असतो.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free