Question
अर्थव्यवस्थेची कार्ये लिहा.

Answer

अर्थव्यवस्थेची प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे आहेत :
(१) कोणत्या वस्तूंचे किती प्रमाणात उत्पादन करायचे यासंबंधीचे निर्णय घेणे. उत्पादन कोणासाठी करायचे याबाबतचे निर्णय घेणे.
(२) कमीत कमी खर्चात, म्हणजेच जास्तीत जास्त काटकसर करून उत्पादन कार्य हाती घेणे.
(३) सामाजिक व आर्थिक न्यायाच्या तत्त्वानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप करणे.
(४) भविष्यकालीन आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी योग्य ती तरतूद करणे. अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करणे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free