Question
जागतिक पर्जन्य वितरणाचा थोडक्यात आढावा घ्या.

Answer

पावसाचे जागतिक वितरण असमान आहे. सर्वसाधारणपणे उष्ण कटिबंधात पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार इतर भागांत विशेषतः किनारपट्टीच्या भागात आणि व्यापारी वाऱ्यांच्या टापूत जास्त पाऊस पडतो.
जगात जास्त, मध्यम आणि कमी पावसाचे प्रदेश आढळतात.
(अ) जास्त पावसाचे प्रदेश : विषुववृत्तीय प्रदेश, आग्नेय आशियाचा मोसमी पावसाचा प्रदेश, वायव्य युरोप, ऑस्ट्रेलियाची पूर्व किनारपट्टी, अमेरिकेचा पूर्व आणि पश्चिम किनारा येथे जास्त पाऊस पडतो.
(ब) मध्यम पावसाचे प्रदेश : जास्त पर्जन्याच्या प्रदेशालगतचे प्रदेश, किनारपट्टीचे प्रदेश येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो.
(क) कमी पावसाचे प्रदेश : ध्रुवीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश, खंडांचे खंडांतर्गत भाग येथे कमी पाऊस पडतो. याव्यतिरिक्त पर्जन्य वितरणाची अन्य वैशिष्ट्येही आढळतात. भारतीय द्वीपकल्पाचा मध्यभाग, हा दोन्हीकडच्या किनारपट्ट्यांपासून दूर, आत, खंडांतर्गत असल्याने तेथे कमी पाऊस पडतो. तर आफ्रिकेच्या पूर्व भागात पर्वतीय प्रदेश आहे त्यामुळे येथील तापमान तुलनेने कमी असल्याने विषुववृत्तीय भागात जशी अभिसरणाची क्रिया घडून येते तशी क्रिया येथे घडून येत नाही. त्यामुळे विषुववृत्ताजवळ असूनदेखील आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात पाऊस कमी पडतो. युरोप खंडाच्या पर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते; कारण तो भाग पर्वतीय प्रदेशाच्या पूर्वेकडे आहे. तसेच तो प्रदेश अटलांटिक महासागरापासून आत, दर असल्याने बाष्पयुक्त वारे तेथे पोहोचू शकत नाहीत. ऑस्ट्रेलिया खंड दक्षिण गोलार्धात असून ऑस्ट्रेलियाची पूर्व किनारपट्टी व्यापारी वाऱ्यांच्या टापूत येते. व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर गोलार्धातील भूभागांच्या पश्चिम किनाऱ्यावर जसा पाऊस पडतो, त्याचप्रमाणे पाऊस दक्षिण गोलार्धात असल्याने ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर होतो.
Image

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free