राज्यशास्त्र - भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesराज्यशास्त्र - भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल2 Marks
Question
आर्थिक विकास दर (GDP).
✓
Answer
(१) उत्पादन व सेवा यांवर जनतेकडून आणि शासनाकडून होणारा खर्च, राष्ट्राची होणारी गुंतवणूक आणि आयात-निर्यातीतील तफावत यांवरून राष्ट्राचा आर्थिक विकास दर निश्चित केला जातो. (२) राष्ट्राचे दरडोई उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पादन यांची मागील वर्षीच्या उत्पादनाशी तुलना करून आर्थिक विकास दर काढला जातो. (३) आर्थिक विकास दरावरून राष्ट्राची उत्पादन क्षेत्रातील प्रगती वा पीछेहाट समजते. ही प्रगती एकाच क्षेत्रात आहे की सर्वांगीण आहे हेही समजते. (४) लोकांच्या राहणीमानाचा दर्जा कसा आहे हे कळते. शासनाला भविष्यातील आर्थिक धोरण ठरवताना योग्य दिशा मिळते.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.