(१) अर्थव्यवस्था म्हणजे विशिष्ट भूप्रदेशातील लोकसमुदाय उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसामग्रीच्या उपयोगाद्वारा वस्तू व सेवांचे उत्पादन आणि उपभोगाशी संबंधित उपक्रमांचा संच आहे.
(२) अर्थव्यवस्थेचे प्रमुख घटक (वैशिष्ट्ये) पुढीलप्रमाणे आहेत :
(i) सुनिश्चित सीमा असलेला भूप्रदेश.
(ii) या भूप्रदेशात वास्तव्य करणारा आणि विविध आर्थिक उपक्रम हाती घेणारा लोकसमुदाय, म्हणजेच लोकसंख्या.
(iii) आर्थिक उपक्रमांसाठी आवश्यक असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती.
(iv) या भूप्रदेशातील सर्वोच्च सत्ता, म्हणजेच राजकीय सार्वभौमत्व.
(v) आर्थिक उपक्रमांचे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायात विभाजन.