Question
जागतिकीकरणाचे स्वरूप स्पष्ट करा.

Answer

(१) जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी संलग्न, एकरूप करण्याची प्रक्रिया होय.
(२) त्याअंतर्गत मुक्त व्यापार असतो. नैसर्गिक साधनसंपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञान मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतात.
(३) परकीय गुंतवणुकीवरील सर्व निर्बंध काढून टाकले जातात. जागतिकीकरणाद्वारा सीमारहित वैश्विक अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
(४) अलीकडच्या काळात सर्व देशांची आर्थिक धोरण अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे, म्हणजेच वैश्विक अर्थव्यवस्थेकडे घेऊन चालली आहेत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free