Question
गटपर्वत कसे निर्माण होतात ? आकृतीसह स्पष्ट करा.

Answer

(१) पृथ्वीच्या अंतर्भागात एकमेकांच्या दिशेने येणाऱ्या ऊर्जालहरी निर्माण होतात, तेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकांवर दाब पडतो. या दाबामुळे कठीण खडकांमध्ये विभंग होतात.
Image
(२) भूपृष्ठावरील कठीण खडकांवर पडलेल्या दाबामुळे दोन समांतर विभंगांमधील भूकवचाचा भाग वर उचलला गेल्यास पर्वताची निर्मिती होते.
(३) या वर उचलल्या गेलेल्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला 'गट पर्वत' म्हणतात.
(४) गट पर्वताचा माथा सपाट असतो. या पर्वतांवर शिखरे नसतात व त्यांचे दोन्ही उतार तीव्र असतात. उदा., भारतातील मेघालय पठार, युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free