(१) वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची 'भौतिक साधने' असे म्हणतात.
(२) भौतिक साधनांवरून प्राचीन काळातील मानवाची प्रगती, त्याची आर्थिक स्थिती, राहणीमानाचा दर्जा इत्यादी बाबी माहीत होतात.
(३) मानवाची कलेतील प्रगती, वास्तुकलेतील प्रगती व बांधकाम शैली इत्यादींविषयीची माहिती मिळते.
(४) लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या मानवाचा इतिहास भौतिक साधनांमधूनच मिळवता येतो.