(१) जे साहित्य पिढ्यान्पिढ्या मौखिक परंपरेने संक्रमित होत राहते, अशा साहित्याला 'मौखिक साधने' असे म्हणतात. मौखिक साहित्याचा कर्ता अज्ञात असतो.
(२) ओव्या, म्हणी, पोवाडे, लोककथा, लोकगीते ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने येत असतात.
(३) या साहित्यातून तत्कालीन लोकजीवनाचे अनेक पैलू, विचार-आचार, रूढी, भाषा, पद्धती व्यक्त होतात; म्हणून अशा साहित्याला इतिहासलेखनाची 'मौखिक साधने' असे म्हटले जाते.
(४) रामायण, महाभारतादी प्राचीन साहित्य प्रारंभीच्या काळात मौखिक परंपरेनेच जतन केले गेले. मौखिक साहित्य कालांतराने लिखित स्वरूपात येते.