Question
हिमवृष्टीची वैशिष्ट्ये सांगा.

Answer

हिमवृष्टीची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :
(१) गोठणबिंदूच्या खाली हवेचे तापमान गेल्यास हवेतील बाष्पाचे संप्लवन क्रियेमुळे थेट हिमकणांत रूपांतर होते. पाण्याच्या अशा हिमकणरूपी वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात.
(२) हिमवृष्टी ही नेहमी उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात सर्वत्र, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात समुद्रसपाटीपर्यंत आणि उष्ण कटिबंधीय प्रदेशात समुद्रसपाटीपासून ५००० मीटरपेक्षा जास्त उंचावर हिमरेषेवरील प्रदेशात होते.
(३) हिम हे घनरूपात असल्याने ते पाण्याप्रमाणे वाहून न जाता त्याचे थरावर थर जमतात. हिम हे भुसभुशीत व अपारदर्शक असते. हिम वितळल्यावर त्यापासून त्या प्रदेशाला पाणी मिळते.
(४) हिमवृष्टीमुळे प्रदेशातील वाहतूक व संदेशवहन सेवा कोलमडते. हिमवृष्टीच्या प्रदेशात लोकांना हिमदाह होऊ नये, म्हणून सतत काळजी घ्यावी लागते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free