Question
मानव अधिकार संरक्षण कायदा.

Answer

(१) १९९३ साली केंद्र शासनाने स्त्री-पुरुषांवरील अन्याय दूर करण्यासाठी 'मानव अधिकार संरक्षण' कायदा संमत केला.
(२) या कायदयाने 'राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा'ची आणि 'राज्य मानवाधिकार आयोगा 'ची स्थापना करण्यात आली.
(३) सामूहिक अत्याचार, घटस्फोटित महिलांची सामाजिक स्थिती, स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ इत्यादी गोष्टींवर या कायद्याने प्रभावी उपाययोजना करून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केली आहे.
(४) स्त्री-पुरुषांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात या कायद्याने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free