इतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान — Social Studies STD 9 — Question
Maharashtra BoardSemi English MediumSTD 9Social Studiesइतिहास - विज्ञान व तंत्रज्ञान2 Marks
Question
पोखरण अणुचाचणी.
✓
Answer
(१) भारताशेजारील अण्वस्त्रधारी चीन व त्याच्या मदतीने अण्वस्त्र तयार करू पाहणारा पाकिस्तान यांच्याकडून होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी भारताला अण्वस्त्र बनवणे आवश्यक होते. (२) शांतता व स्वयंपूर्णता हे भारताचे धोरण होते. (३) त्यानुसार भारताने १८ मे १९७४ रोजी राजस्थानमधील पोखरण येथे पहिली अणुचाचणी यशस्वी केली. (४) मानवी वस्तीपासून लांब व भूगर्भात पाण्याचा साठा जवळपास नाही, या अटींनुसार पोखरण हे ठिकाण या चाचणीसाठी निवडण्यात आले. (५) १९९८ सालीही दुसऱ्यांदा याच ठिकाणी अणुचाचण्या घेतल्या गेल्या.
Need a full question paper?
Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.