Question
वीस कलमी कार्यक्रम.

Answer

भारताला विकसित राष्ट्र बनवावे, या हेतूने प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी १ जुलै १९७५ रोजी 'वीस कलमी कार्यक्रमा'ची घोषणा केली. या कार्यक्रमातील काही प्रमुख कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
(१) शेतमजुरांना किमान वेतन देणे व जलसंधारण योजनांत वाढ करणे.
(२) कामगारांचा उद्योगक्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती.
(३) करचुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे.
(४) जीवनावश्यक वस्तूंचे दरनियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे.
(५) घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free