(१) प्रदूषण (Pollution) या संकल्पनेचा उद्गम इंग्रजी भाषेतील to pollute या शब्दापासून झाला आहे. To pollute याचा अर्थ दूषित करणे आणि जे घटक वातावरण दूषित करतात, त्यांना प्रदूषके (pollutent) असे म्हणतात.
(२) ही प्रदूषके जमीन, पाणी आणि हवेत मिसळल्याने भूप्रदूषण, जलप्रदूषण आणि वायुप्रदूषण उद्भवते. या प्रदूषणाचा आपले परिसर आणि आरोग्य यांवर प्रतिकूल परिणाम होत असतो.
(३) शहरी भागात प्रदूषणाचे प्रमाण अधिक असते. म्हणून प्रदूषण ही नागरीकरणापासून उद्भवलेली समस्या आहे, असे म्हणतात.
(४) प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने विविध कायदे केले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यावर उपाययोजना करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. आपणही व्यक्तिगत पातळीवर प्रदूषण उद्भवू नये यासाठी स्वच्छ भारत अभियानासारख्या उपक्रमात सक्रियरीत्या सहभागी होणे अपेक्षित आहे.