(१) भू-हिमोढ, पार्श्व हिमोढ, मध्य हिमोढ व अंत्य हिमोढ हे हिमोढाचे चार प्रकार होत.
(२) हिमनदीच्या तळाशी संचयित झालेल्या हिमोढास भू-हिमोढ म्हणतात. हिमनदीच्या काठाकडील संचयित हिमोढास पार्श्व हिमोढ म्हणतात.
(३) जेव्हा दोन हिमनद्या एकत्र येतात, तेथे त्यांच्या आतील दोन कडांच्या भागातील पार्श्व हिमोढांपासून मुख्य हिमनदीच्या पात्रात मध्य हिमोढ तयार होतो.
(४) हिमनदीच्या अग्रभागी म्हणजे जेथे हिमप्रवाहाचे जलप्रवाहात रूपांतर होते, तेथून पुढे जलप्रवाह हिमनदीने आणलेला सर्व हिमोढ पुढे वाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे या भागात हिमोढ साचतो. हा हिमोढ हिमनदीच्या शेवटच्या भागात असल्यामुळे त्याला अंत्य हिमोढ म्हणतात.