(१) संग्रहालये म्हणजे वस्तू, हत्यारे, नाणी, शिल्पे यांचे कलात्मकतेने मांडलेले प्रदर्शनच होय.
(२) संग्रहालयात ठेवलेल्या वस्तूंमुळे अभ्यासकाला त्या काळाचा अभ्यास करता येतो.
(३) संग्रहालयाचे ऐतिहासिक संग्रहालय, कला वा शस्त्रास्त्र संग्रहालय, प्राणी संग्रहालय असे अनेक प्रकार पडतात.
(४) प्रत्येक राज्यात आपल्या राज्याची वैशिष्ट्ये सांगणारी संग्रहालये आहेत.
(५) काही संग्राहक आपल्या आवडीच्या वस्तूंचा, मूर्तीचा वा शिल्पांचा संग्रह करीत असतात.
(६) इतिहासाच्या अभ्यासाच्या भौतिक साधनांत अशी संग्रहालये महत्त्वाची असतात.
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे.