Question
तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी, तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते.

Answer

(१) ईशान्य आफ्रिका आणि अरेबियाचे द्वीपकल्प यांमध्ये असलेला तांबडा समुद्र हा एक अत्यंत चिंचोळा, लांब समुद्र आहे. या समुद्राचे दक्षिण टोक हिंदी महासागरात असून उत्तरेकडील भाग हा भूवेष्टित आहे. (२) त्यामुळेच हिंदी महासागरातील सागरी प्रवाहांचा प्रत्यक्ष प्रभाव तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस पडतो आणि त्या प्रवाहांमुळेच येथील क्षारतेचे संतुलन झाल्याने परिणामी क्षारता कमी आढळते. (३) उत्तरेकडील भाग मात्र सहारा वाळवंटाच्या आणि अरेबियाच्या वाळवंटाच्या जवळ असल्याने जास्त तापमान, जास्त बाष्पीभवन होते आणि त्यामुळे तेथील क्षारता जास्त आढळते.

Need a full question paper?

Generate a complete, print-ready paper with questions like this in minutes — across 16+ boards, with answer keys.

Start Generating Free